

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपला कर्णधार बनवले आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे. या निर्णयानंतर मुंबईला चांगलाच फटका बसला आहे. हार्दिकला संघाचे कर्णधार करताच मुंबईच्या सोशल मीडिया अकाउंटवरील लाखो फॉलोअर्सनी त्यांना अन् फॉलो केला आहे. (Shame on MI)
रोहित शर्माने 11 हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. 2013 साली झालेल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार बनवले होते. रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माशिवाय फक्त महेंद्रसिंग धोनीने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हार्दिक पांड्या आयपीएल 2015 मध्ये पहिल्यांदा खेळला होता. त्यानंतर तो आयपीएल २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. पण आयपीएल मेगा लिलाव २०२२ च्या आधी, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज केले. मुंबई इंडियन्सनंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा भाग बनला. गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती आयपीएल 2023 च्या मोसमात उपविजेता संघ ठरला.
अलीकडेच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर सतत ट्रेंडमध्ये असतो. तसेच हार्दिक पांड्याला अचानक कर्णधार बनल्याबद्दल सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Hardik Pandya)
हेही वाचा :