MS Dhoni jersey retired : BCCI कडून धोनीचा सन्मान, ७ नंबर जर्सी रिटायर्ड | पुढारी

MS Dhoni jersey retired : BCCI कडून धोनीचा सन्मान, ७ नंबर जर्सी रिटायर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने (BCCI) ने महेंद्रसिंग धोनी याची 7 नंबरची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे. यापूर्वी 2017 मध्येही महान फलंदाज सचिन तेंडुलकर परिधान करत असलेली 10 क्रमांकाची जर्सीही कायमची रिटायर्ड केली होती. (MS Dhoni jersey retired)

टीम इंडियाचा दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनीची आयकॉनिक नंबर 7 जर्सी यापुढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला उपलब्ध होणार नाही. धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर सुमारे ३ वर्षांनी बीसीसीआयने हा निर्णय घेतला. बीसीसीआयने म्हटले आहे की, धोनीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत वापरलेली 7 नंबरची जर्सी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. (MS Dhoni jersey retired)

धोनीचा टी-शर्ट रिटायर्ड केल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांच्या वृत्तातून दिली आहे. असा सन्मान मिळवणारा धोनी दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील असा सन्मान बीसीसीआयने दिला होता. 2017 साली सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत वापरलेल्या 10 क्रमांकाची जर्सीही कायमची निवृत्त करण्यात आली होती.

धोनीची आयकॉनिक 7 क्रमांकाची जर्सी इतर कोणताही भारतीय क्रिकेटर परिधान करता येणार नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी, धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल त्याने परिधान केलेला नंबर ‘रिटायर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये T20 विश्वचषक, त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. 2014 मध्येच त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली होती.

हेही वाचा :

Back to top button