Latest
Pakistan Earthquake | पाकिस्तानात भूकंप, ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानात आज शुक्रवारी सकाळी ९.१३ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे. (Pakistan Earthquake) सुदैवाने या भूकंपानंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याआधी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानात भूकंपाचे हादरे जाणवले होते. पाकिस्तानमध्ये अधिक तीव्रतेच्या भूकंपांचा इतिहास आहे. २४ सप्टेंबर २०१३ रोजी अवारन, केच प्रदेशात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

