खासदार दानिश अली ‘बसपा’तून निलंबित, पक्षविरोधी कारवायांमध्‍ये सहभागी असल्‍याचा ठपका | पुढारी

खासदार दानिश अली 'बसपा'तून निलंबित, पक्षविरोधी कारवायांमध्‍ये सहभागी असल्‍याचा ठपका

पुढारी ऑनलाई डेस्‍क : बहुजन समाज पार्टीने अमरोहा मतदारसंघातील खासदार दानिश अली (Danish Ali )  यांना निलंंबित केले आहे. पक्षविरोधी कारवायांमध्‍ये सहभागी असल्‍याचा ठपका त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे.

Danish Ali : तुम्हाला अनेकदा चेतावणी देण्यात आली होती

“पक्षाची धोरणे, विचारधारा आणि शिस्तीच्या विरोधात विधाने किंवा कृती करण्याबद्दल तुम्हाला अनेकदा चेतावणी देण्यात आली होती. परंतु, तरीही तुम्ही सतत पक्षाच्या विरोधात वागत आहात,” बसपाने एका निवेदनात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी अली यांच्या विरोधात संसदेत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर ते चर्चेत आले होते. सप्टेंबरमध्ये चांद्रयान-3 मोहिमेवर झालेल्या चर्चेदरम्यान श्री बिधुरी यांच्या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. विशेष म्‍हणजे, लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी शुक्रवार ८ डिसेंबर रोजी संसदेबाहेर निदर्शने केली होती.

हेही वाचा :

 

Back to top button