Bhandara News: नर्सिंग होस्टेलमधील ४० विद्यार्थिनींची एकाचवेळी प्रकृती बिघडली | पुढारी

Bhandara News: नर्सिंग होस्टेलमधील ४० विद्यार्थिनींची एकाचवेळी प्रकृती बिघडली

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : येथील शासकीय नर्सिंग होस्टेलमधील ४० विद्यार्थिनींना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काही विद्यार्थिनींना आज (दि.९) सुटी देण्यात आली. तर ७ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. विषबाधेतून त्यांची प्रकृती खालावल्याची शक्यता असून सामान्य रुग्णालय प्रशासनाने मात्र विषबाधा नसल्याचे सांगितले आहे. Bhandara News

शहरात शासकीय नर्सिंग होस्टेल असून जीएनएम व एएनएमच्या विद्यार्थिनी त्याठिकाणी राहतात. शुक्रवारी काही विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. होस्टेलच्या अधिकाऱ्यांनी आणखी काही विद्यार्थिनींची चौकशी केली असता त्यांनाही अस्वस्थ वाटू लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनाही सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर आज सकाळी ३३ विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली. तर प्रकृती खालावलेल्या ७ विद्यार्थिनींवर अजूनही उपचार सुरू आहेत. Bhandara News

एकाचवेळी ४० विद्यार्थिनी आजारी पडल्याने खळबळ उडाली होती. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सर्व विद्यार्थिनींच्या विविध तपासण्या केल्या. त्यात निगेटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थीनींना सुटी देण्यात आली. विषबाधेची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. तर हा प्रकार विषबाधेचा नसून व्हायरल असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button