भंडारा: अड्याळ येथे अपघातात तरुणाचा मृत्यू | पुढारी

भंडारा: अड्याळ येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२५) दुपारी १२.१५ च्या सुमारास अड्याळ येथील बसस्थानकासमोर घडली. मनीषकुमार रामकृष्ण पांडे (वय ३४, रा. नानक वॉर्ड, शांतीनगर भंडारा)  असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनीषकुमार हे दुचाकीने भंडाऱ्याहून पवनीकडे जात असताना मागून येणाऱ्या ट्रेलरने (एमएच ४० सीएम ५७५७) भरधाव येत दुचाकीला  धडक दिली. यात मनीषकुमार गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तात्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.  पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष मस्के करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button