भंडारा : तोतया पोलिसांनी पळविले महिलेचे दागिने | पुढारी

भंडारा : तोतया पोलिसांनी पळविले महिलेचे दागिने

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : आम्ही पोलिस आहोत. एवढे सोने अंगावर घालू नका, अन्यथा तुम्हाला ५ हजार रुपये दंड होईल, अशी थाप मारुन दोन अज्ञात भामट्यांनी महिलेचे लाखो रुपयांचे सोने पळवून नेल्याची घटना शहरातील शुक्रवारी वॉर्डात दिवसाढवळ्या घडली.
नलू लटारू साकुरे (रा. शुक्रवारी वॉर्ड) असे या पीडित महिलेचे नाव आहे.

या सकाळी घरी जात असताना विघ्नहर्ता हॉटेलजवळ दोन इसम त्यांच्या कडे आले. त्यांनी तिला आम्ही पोलिस असून तुम्ही एवढे सोने अंगावर घालून जावू नका अन्यथा तुम्हाला ५ हजारांचा दंड लागेल, असे सांगितल्याने महिलेने लगेच सोन्याचे पाटल्या (किंमत १ लाख ७३ हजार), एक हार (किंमत ५९ हजार), मोहनमाळ (किंमत ५९ हजार), अंगठी (किंमत ५ हजार ७००) अंगावरुन काढले.

त्यानंतर आरोपींनी आपल्या खिशातील कागद काढून त्यात दागिने गुंडाळले. व महिलेच्या थैलीमध्ये ठेवले. सदर महिला घरी गेल्यानंतर तिने सोन्याचे दागिने ज्या कोऱ्या कागदात गुंडाळले होते तिथे एक प्लास्टिकची बांगडी दिसून आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय जायभाये करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button