Kim Jong Un : ‘मुलं जन्माला घाला’ म्हणून रडू लागला हुकूमशहा! | पुढारी

Kim Jong Un : 'मुलं जन्माला घाला' म्हणून रडू लागला हुकूमशहा!

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा (Kim Jong Un) कधी काय करील याचा नेम नसतो. त्याच्या लहरीपणाचे अनेक किस्से प्रचंड गोपनीयता पाळूनही जगभर प्रसिद्ध झाले आहेत. आता एका कार्यक्रमात हा क्रूरकर्मा चक्क रडत असताना दिसून आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या : 

या व्हिडीओत किम जोंग उन (Kim Jong Un) भावुक झाल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर भावुक होऊन तो चक्क रडू लागला होता. देशातील जन्मदर घसरत असल्याने चिंता व्यक्त करताना त्याने महिलांना राष्ट्रीय कर्तव्य समजून जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत किम जोंग उन खाली पाहताना आणि डोळे पुसताना दिसत आहे. किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात पार पडलेल्या राष्ट्रीय माता परिषदेला प्रमुख उपस्थिती लावली होती. गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियामध्ये अशा प्रकारची परिषद झाल्याचं दिसून आलं. या परिषदेमध्ये किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशातील जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत सातत्याने घटणाऱ्या जन्मदराचं आव्हान मोठं असून त्याचा सामना करण्यासाठी देशातल्या मातांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावं, अशी अजब विनंती किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी या परिषदेत केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या भाषणानंतर उपस्थित महिलांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले होते. यावेळी त्याने राष्ट्रीय शक्ती मजबूत करण्यात मोलाची भूमिका निभावल्याबद्दल मातांचे आभार मानले. ‘जेव्हा कधी मला पक्ष आणि देशाची कामं करताना फार अडचण येते तेव्हा मी नेहमी मातांचा विचार करतो,’ असं किम जोंग उन यावेळी म्हणाला.

उत्तर कोरियात गेल्या काही दशकात जन्मदरात मोठी घसरण झाली आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अंदाजे २०२३ पर्यंत प्रजनन दर किंवा एका महिलेला जन्माला येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या उत्तर कोरियामध्ये १.८ होती. अलीकडील काही दशकांमध्ये झालेली ही मोठी घसरण आहे. उत्तर कोरियाच्या शेजारील राष्ट्रांमध्ये समान परिस्थिती असतानाही प्रजनन दर जास्त आहे. दक्षिण कोरियाचा प्रजनन दर गेल्या वर्षी विक्रमी नीचांकी ०.७८ पर्यंत खाली आला होता, तर जपानचा आकडा १.२६ पर्यंत घसरला.

हेही वाचा : 

Back to top button