मानवासह अनेक प्राण्यांच्या अल्पायुष्याला डायनासोर जबाबदार? | पुढारी

मानवासह अनेक प्राण्यांच्या अल्पायुष्याला डायनासोर जबाबदार?

न्यूयॉर्क : कधी कधी संशोधक हे भलतेच बादरायणी संबंध जोडत असतात. आता माणूस दोनशे वर्षे जगत नाही याला कारण म्हणजे डायनासोर असे कुणी म्हटलं तर आपण ‘काय संबंध?’ असेच विचारू. हा संबंध आता एका संशोधकाने शोधून काढला आहे. डायनोसोर हे पृथ्वीवरून लुप्त झालेले प्राचीन सजीव आहेत. डायनोसॉर हे अनेक वर्षे जिवंत राहत होते. पूर्वी मनुष्यांचे आयुष्य देखील दीर्घकालीन होते. 100 ते 200 वर्षांपर्यंत मनुष्य जगत होते. माणसं आता 200 वर्षे जगत नाहीत याला डायनासोर जबाबदार आहेत, असा दावा या संशोधकाने केला आहे.

अनेक जीवांमधील अनुवंशिक गुण मानवात देखील आले. यामुळेच इतर सजींवाप्रमाणाचे मनुष्याचे आयुष्यमान देखील कमी कमी होत गेले. डायनोसोरमुळेच इतर जीवांसह मानवाचे आयुष्यमान कमी झाल्याचा हा दावा यूकेमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जोआओ पेड्रो डी मॅगाल्हेस यांनी केला आहे.

जीवसाखळीत टिकून राहण्यासाठी अनेक सजीव प्रजातींनी आपली प्रजनन क्षमता वाढवल्याने अनेक जीवांचे आयुष्यमान कमी होऊ लागले. वुली मॅमथ प्राण्याचे अस्तित्व असतानाच मानवाची उत्क्रांती झाली. डायनोसोर हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली जीव होता. यानंतर अनेक प्रकारचे प्राणी अस्तित्वात आले. वुली मॅमथ हा देखील डायनोसॉरप्रामाणेच एक महाकाय प्राणी होता. 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेल्या उल्कापातामुळे डायनोसरचा विनाश झाल्याचा संशोधकांचा दावा आहे.

Back to top button