दुर्दैवी ! विजेचा धक्का लागून ९ गायी दगावल्या | पुढारी

दुर्दैवी ! विजेचा धक्का लागून ९ गायी दगावल्या

हिंजवडी: पुढारी वृत्तसेवा : रविवारी सायंकाळी आयटी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने कासारसाई परिसरात मोठे नुकसान झाले. येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिखरे यांच्या गाईच्या गोठ्यातील सुमारे ९ गायी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. पावसाने त्यांच्या गोठयास विजेच्या प्रवाहामुळे करंट बसल्याने ही घटना घडली. शिखरे यांच्या दुभत्या गाई होत्या. रात्री त्यांच्या दोन गाई दगावल्या. मात्र सोमवारी सकाळी गाईच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेलेले त्यांचे चिरंजीव विक्रम शिखरे यांच्या ही बाब निदर्शनास आली.

त्यावेळी काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित होता. मात्र या दरम्यान वीज पुरवठा पुन्हा आल्याने उर्वरित गायी देखील मृत्युमुखी पडल्याचे विक्रम यांनी सांगितले. या घटनेत शिखरे कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यात सुमारे ८-१० लाख पर्यंत असल्याची शक्यता राजेंद्र शिखरे यांनी सांगितली. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासह परिसरातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिखरे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button