मराठा आरक्षणाला विरोध नाही ; ओबीसीतून नको : छगन भुजबळ | पुढारी

मराठा आरक्षणाला विरोध नाही ; ओबीसीतून नको : छगन भुजबळ

पुढारी ऑनलाईन : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी सुरू आहे. पुण्यात शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांची मीटिंग सुरू असताना स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी भुजबळांना आव्हान दिलं आहे. यानंतर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी उत्तरे दिली.

भुजबळ म्हणतात, मराठा आरक्षणाला विरोध नाही, माझा आरोप झुंडशाहीला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जावं.  शिंदे समितीबाबत भुजबळ यांना विचारलं असता शिंदे समितीला बरखास्त करा असं आपण म्हटलं नव्हतं तर या समितीचे काम संपल्याने आपण ती बरखास्त करण्याबाबत बोललो होतो असे ते म्हणाले. पुढे ते म्हणतात, ‘मराठवाड्यातील काम संपले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट कुणबी ही मागणी मान्य केली नाही. कधीच करणार नाही. यात कुणबी सर्टिफिकेट आधीच असेल तर आरक्षणात आहेत. पण पेनाने किंवा पुन्हा खाडाखोड करून केलेली नोंद मान्य नाही.

आंतरवाली पोलिसांवर हल्ले झाले त्यावेळी 70 पोलिस कर्मचारी जखमी झाले. अशा परिस्थितीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मुळात सगळ्यात आधी पोलिसांवर दगडफेक झाली होती हे विसरता कामा नये.’ यावर मी सर्वपक्षीय बैठकीतही बोललो असल्याचं ते म्हणाले.

हुतात्मा स्मारकावर गेलोच नाही.. 

मी हुतात्मा स्मारकावर गेलो नाही. तर मी राजीव सातव यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो.

शरद पवारांशी चर्चा नाही 

आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारसाहेबांशी काहीच बोलणं झालं नाही. मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी साहेबांनी केली. मी त्यांच्यासोबत 30 वर्षं काम केलं आहे त्यामुळे साहेबांविषयी मनात आदर आहे.

Back to top button