Miss Universe 2023 | शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब, ठरली निकाराग्वाची पहिली महिला | पुढारी

Miss Universe 2023 | शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब, ठरली निकाराग्वाची पहिली महिला

पुढारी ऑनलाईन : मध्य अमेरिकन देश निकाराग्वाचे प्रतिनिधीत्व करणारी शेनिस पॅलासिओस (Nicaragua’s Sheynnis Palacios) हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. (Miss Universe 2023) मिस युनिव्हर्स २०२३ ची विजेती म्हणून निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसची घोषणा करण्यात आली. तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड फर्स्ट रनर-अप आणि ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन सेकंट रनर-अप ठरली. ही स्पर्धा एल साल्वादोर येथील जोस अडोल्फो पिनेडा अरेना येथे आयोजित करण्यात आला होता.

Image

शेनिसला मिस युनिव्हर्स २०२३ चा मुकूट मिस युनिव्हर्स २०२२ अमेरिकेच्या आर’बोनी गेब्रियलने परिधान केला. यावेळी शेनिस आनंदाश्रू आवरले नाहीत. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी शेनिस ही निकाराग्वाची पहिला महिला आहे. ( Miss Nicaragua wins Miss Universe)

यावर्षी चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदा हिने मिस युनिव्हर्स २०२३ साठी भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप २० फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले. यावर्षी पाकिस्ताननेही पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.

यंदाच्या ७२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ८४ देश आणि प्रदेशातील स्पर्धक होत्या. अमेरिकन टेलिव्हिजन प्रेझेंटर मारिया मेनोनोस व्यतिरिक्त अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट जीनी माई आणि मिस युनिव्हर्स २०१२ ऑलिव्हिया कल्पो यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

‘या’ प्रश्नाच्या उत्तराने जिंकली स्पर्धा

शेनिस पॅलासिओस हिला “जर तुम्हाला दुसर्‍या महिलेच्या जागी एक वर्ष जगायचे असेल, तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?” असा प्रश्न अंतिम फेरीत विचारला होता. त्यावर तिने उत्तर दिले “मी मेरी वॉटसन ब्रॅड यांची निवड करेन. कारण त्यांना व्यासपीठ खुले केले आणि अनेक महिलांना संधी दिली. मला हेच करायचे आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त महिला काम करण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतील. कारण असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला काम करू शकत नाहीत.”

हे ही वाचा :

Back to top button