Miss Diva Universe: चंदिगढची Shweta Sharda ठरली मिस दिवा युनिव्हर्स | पुढारी

Miss Diva Universe: चंदिगढची Shweta Sharda ठरली मिस दिवा युनिव्हर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंदिगढची श्वेता शारदा (Shweta Sharda) ने मिस दिवा युनिव्हर्स २०२३ (Miss Diva Universe 2023) चे टायटल आपल्या नावे केला आहे. काल रात्री मुंबईमध्ये या इव्हेंटमध्ये मिस दिवा युनिव्हर्स २०२२ दिविता राय (Divita Rai) ने श्वेताला मुकूट परिधान केला. दिल्लीची सोनल कुकरेजा (Sonal Kukreja) ला मिस दिवा सुपरनॅशनल २०२३ (Miss Diva Surpernational) चे मुकूट परिधान करण्यात आले आणि कर्नाटकाची तृषा शेट्टी (Trisha Shetty) मिस दिवा २०२३ रनर-अप ठरली. (Miss Diva Universe 2023)

आता श्वेता शारदा ७२ व्या मिस युनिव्हर्स (Miss Universe) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि सोनल कुकरेजा मिस सुपरनॅशनलच्या १२ व्या एडिशनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

कोण आहे श्वेता शारदा?

मिस दिवा युनिव्हर्स २०२३, श्वेता शारदा, २२ वर्षांची चंदिगढची राहणारी आहे. श्वेताला तिच्या सिंगल पॅरेंट आईने लहानाचे मोठे केले. ती आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी १६ वर्षांच्या वयात मुंबईत आली होती. जेव्हा श्वेताला विचारण्यात आले की, तिच्या जीवनात सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण आहे, तेव्हा तिने आपल्या आईचे नाव घेतला. ब्युटी क्वीन श्वेता डीआयडी, डान्स दिवाने आणि डान्स+ सारख्या शोमध्ये दिसली होती. ती झलक दिखलाजा शोमध्ये कोरिओग्राफर देखील होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Diva (@missdivaorg)

श्वेता महिलांसाठी उत्तम शिक्षण, समान संधी आणि सेल्फ डिफेन्स स्किलशी संबंधित काम करते. शारदाने CBSE बोर्ड स्कूलमधून शिक्षण घेतले. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून पदवीचे शिक्षण घेत आहे.

एका मुलाखतीत, श्वेताने सांगितले की, तिच्या जीवनातील अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतातील सर्वात प्रेमळ अभिनेत्यांसोबत काम करणे आणि डान्स शिकवणं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण, सलमान खान, कॅटरीना कैफ, मौनी रॉय आणि माधुरी दीक्षित देखील सहभागी आहेत. ब्युटी क्वीन सुष्मिता सेनमुळे सर्वाधिक प्रेरित करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shwetasharda (@shwetasharda24)

Back to top button