नाशिक : गिरणा नदी पुलावर २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार | पुढारी

नाशिक : गिरणा नदी पुलावर २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

देवळा ; पुढारी वृत्‍तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान दोन कार आणि दोन दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. स्कुटीवरील चालक कळवण येथील सागर देवरे हे यामध्ये जागीच ठार झाले. ठेंगोडा ता. बागलाण येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे या जखमी झाल्‍याने त्‍यांना सटाणा येथील खासगी दवाखाण्यात उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त दुचाकीवरील व्यक्तीचा तपास लागला असून, अपघातग्रस्त डिस्कवर मोटरसायकल व कार मधील व्यक्तीचा तपास लागलेला नाही. देवळा पोलीस या अपघाताबाबत पुढील तपास करीत आहेत. अपघातामुळे गिरणा नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्‍त्‍यावरून बाजुला करत वाहतूक सुरळीत चालू केली. याबाबत देवळा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, एपीआय दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button