मुस्लिम समाज नेहमीच ऐक्यासोबत : ज्येष्ठ नेते शरद पवार | पुढारी

मुस्लिम समाज नेहमीच ऐक्यासोबत : ज्येष्ठ नेते शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  माझ्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीपासून बारामती शहर आणि तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव हे नेहमी सामाजिक ऐक्याच्या विचारांसोबत राहिला आहे. त्यामुळेच बारामतीतील मुस्लिम बांधव कधीही चुकीच्या विचारांसोबत जाणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून बारामतीतील मरहूमा फरजाना फाउंडेशन यांनी इस्लाम सर्वासाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत पवार यांना कुरआन व इस्लामिक मराठी साहित्य भेट देण्यात आले. या वेळी बारामती मुस्लीम आम जमातचे अध्यक्ष जब्बार पठाण, मरहूमा फरजाना फाउंडेशनचे अध्यक्ष जहीर पठाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष ढोले, अ‍ॅड. अमित ढोले, मुनीर तांबोळी,समीर मुलाणी, एजाज अत्तार, जावेद बागवान, अमान पठाण उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button