कोल्हापूर: हुपरीतील भगवा रक्षक संघटनेचे कार्यकर्ते अंतरवाली सराटीला रवाना | पुढारी

कोल्हापूर: हुपरीतील भगवा रक्षक संघटनेचे कार्यकर्ते अंतरवाली सराटीला रवाना

हुपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना  हुपरी  शहरात येण्यास बंदी घालण्यात येत आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हुपरी येथील सकल  मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथील समाजाच्या झालेल्या बैठकीत राजकीय मंडळींना शहरात प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला न्यायालयाच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रविशंकर चिटणीस, उपाध्यक्ष संजय निकम , सचिव सचिन जाधव, खजिनदार अजित उगळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, मनोज जरांगे- पाटील यांची भेटू घेऊन पाठिंबा देण्यासाठी भगवा रक्षक संघटनेचे पदाधिकारी अंतरवाली सराटीला रवाना झाले आहेत. यात मनसे तालुकाध्यक्ष व नगरसेवक दौलतराव पाटील, शहराध्यक्ष गणेश मालवेकर, विभागप्रमुख पदमाकर चौगुले, महादेव पाटील, दत्ताजी घोरपडे, कुष्णात निकम, सागर पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा 

Back to top button