J&K Terrorist attack: श्रीनगरमध्‍ये दहशतवाद्यांचा पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार | पुढारी

J&K Terrorist attack: श्रीनगरमध्‍ये दहशतवाद्यांचा पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार

पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या इदगाह भागात दहशतवाद्यांनी पोलीस अधिकार्‍यावर गाेळीबार केला. जखमी पोलीस अधिकार्‍याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील ईदगाहजवळ दहशतवाद्यांनी पाेलीस अधिकारी मसरूर अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्‍ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली असून, घटनास्थळी शोधमोहीम राबवली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button