

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनोख्या शतकी विक्रमाची नोंद झाली आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. (सर्व फॉरमॅट) कर्णधारपदाचे शतक झळकवणर तो भारताचा सातवा खेळाडू ठराला आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे. यासह 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार करणारा रोहित जगातील 50 वा खेळाडू ठरला आहे. (Rohit Sharma)
भारताचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीने 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. तर अझरुद्दीनने 221 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. कोहलीने 213, सौरव गांगुली 195, कपिल देव 108 आणि राहूल द्रविड यांनी द्रविड 104 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी धोनी आणि कोहली यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले.(Rohit Sharma)
कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 99 पैकी 73 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर 23 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. विजयांच्या बाबतीत रोहितचा विक्रम कपिल आणि द्रविडपेक्षा सरस ठरला आहे.
रोहितने आतापर्यंत 51 टी-20 सामने, 39 एकदिवसीय आणि नऊ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नऊपैकी पाच कसोटी जिंकल्या आहेत, तर दोन गमावल्या आहेत. दोन सामने ड्रॉ झाले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 39 पैकी 29 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, तर 9 सामने गमावले आहेत. एक सामना टाय राहिला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 51 पैकी 39 टी-20 सामने जिंकले आहेत, तर 12 सामने गमावले आहेत.
कर्णधार म्हणून रोहित शर्माची फलंदाजीही उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 42.58 च्या सरासरीने 3918 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो भारतीय कर्णधारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 213 सामन्यात 59.92 च्या सरासरीने 12,883 धावा केल्या. यामध्ये 41 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. (Rohit Sharma)
हेही वाचा :