Bhabi Ji Ghar Par Hai : ‘भाबीजी घर पर है’मधील कलाकारांनी घेतला दसऱ्याचा आनंद | पुढारी

Bhabi Ji Ghar Par Hai : 'भाबीजी घर पर है'मधील कलाकारांनी घेतला दसऱ्याचा आनंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील कलाकार आसिफ शेख व रोहिताश्‍व गौड त्‍यांच्‍या भूमिका विभुती नारायण मिश्रा व मनमोहन तिवारीसाठी अत्‍यंत लोकप्रिय आहेत. (Bhabi Ji Ghar Par Hai) नुकतेच त्‍यांनी नवी दिल्‍लीमधील लाल किल्‍ला येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या लव कुश रामलीला साजरीकरणाचा आनंद घेतला. (Bhabi Ji Ghar Par Hai)

संबंधित बातम्या – 

आसिफ शेख यांनी गेल्‍या वर्षी मालिकेमधील त्‍यांची पत्‍नी अनिता भाबीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्‍तव यांच्‍यासोबत शहराला भेट दिली होती आणि त्‍यांनी पुन्‍हा एकदा दिल्‍लीमधील दसरा सणाचा आनंद घेतला. त्‍यांनी आपले बहुतांश जीवन दिल्‍लीमध्‍ये व्‍यतित केले आहे. रोहिताश्‍व गौड यांना त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या अभिनय दिवसांची आठवण झाली. रामलीला साजरीकरणाचा आनंद घेण्‍यासह प्रख्‍यात इंडिया गेट येथे प्रेमळ चाहत्‍यांची गाठभेट घेत या डायनॅमिक जोडीने दिल्लीमधील पाककलांचा आस्‍वाद घेतला. स्‍थानिक ठिकाणी शॉपिंग केली आणि रस्‍त्‍यावर चाहत्‍यांसोबत गप्‍पागोष्‍टी केल्या.

आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ”दिल्‍लीमधील रामलीलाचे माझ्या मनात खास स्‍थान आहे. प्रत्‍येक भेटीसह या साजरीकरणाप्रती आणि येथील अविश्‍वसनीय प्रेक्षकांप्रती माझी आवड वाढत आहे. मला रामलीलामध्‍ये सहभाग घेण्‍याची संधी कधीच मिळाली नाही, पण मी माझ्या मित्रांसोबत लाल किल्‍ला येथे जाऊन सर्वात पहिल्‍या रांगेमधील सीट मिळवायचा आणि जवळून परफॉर्मन्‍स पाहण्‍याचा आनंद घ्‍यायचो. आता मला मंचावर लाइव्‍ह पाहण्याची संधी मिळते. पुन्‍हा एकदा माझे सह-कलाकार रोहिताश्‍व (तिवारी जी) माझ्यासोबत चार वर्षांनी हा अनुभव घेण्यासाठी सोबत होतो. आयोजक व उपस्थित जमावाने प्रेम व उत्‍साहाने आमचे स्‍वागत केले, जे पाहून आम्‍ही भारावून गेलो.

रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ”रामलीला पाहताना मला माझ्या किशोरवयीन काळाची आठवण झाली, जेथे मी चंदिगडजवळील शहर कालका येथील उत्‍साहपूर्ण सण साजरीकरणामध्‍ये आनंदाने सहभाग घ्‍यायचो. मी अंगद व विभिषणाची भूमिका साकारायचो, पण मनातून मी श्रीरामाची भूमिका साकारण्‍यासाठी उत्‍सुक असायचो. एकेकाळी मी नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामामध्‍ये असताना या शहरात राहिलो आहे, पण माझ्या व्‍यस्‍त वेळापत्रकामुळे मला शहरामध्‍ये फेरफटका मारण्‍याची संधी मिळाली नाही.”

Back to top button