छ.संभाजीनगर: तोंडोळी येथे पालकमंत्री संदिपान भुमरेंचा फलक जाळला | पुढारी

छ.संभाजीनगर: तोंडोळी येथे पालकमंत्री संदिपान भुमरेंचा फलक जाळला

पैठण, पुढारी वृत्तसेवा: जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत तोंडोळी (ता. पैठण) येथे लोकप्रतिनिधींचे डिजिटल फलक लावण्यास गावकऱ्यांनी बंदी घातली आहे. यावेळी फलक व निवडणूक ओळखपत्र जाळण्याची मोहीम सुरू केल्यामुळे दीपावली, दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.

असाच एक फलक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा लावण्यात आला होता. त्यांच्या फोटोसह वॉटर पार्क उद्घाटन संदर्भातील हा फलक तोंडोळी येथे लावण्यात आला होता. परंतु, आज (दि.२२) अमोल जाधव, कृष्णा आगळे, उमेश गरड, गणेश कदम यांच्यासह तरुणांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये पुढाऱ्यांचे फलक लावून देणार नाही, असा पवित्रा घेत डिजिटल फलक व निवडणूक मतदान ओळखपत्र जाळून टाकले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ठीकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींना गाव प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मतदार संघातील विकासकामांचे उद्घाटन आणि फलक कसे लावायचे असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा 

Back to top button