गडचिरोली : पोलिसांनी हाणून पाडला नक्षल्यांचा खंडणी वसुलीचा प्रयत्न

गडचिरोली : पोलिसांनी हाणून पाडला नक्षल्यांचा खंडणी वसुलीचा  प्रयत्न

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : अहेरी तालुक्यातील गॅरेवाडा गावानजीकच्या इंद्रावती नदी परिसरातील जंगलात बुधवारी (दि.6) पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. तेंदू कंत्राटदाराकडून खंडणी वसुली करण्यासाठी नक्षलवादी बैठक घेणार होते. मात्र, पोलिसांनी वेळीच पोहचून नक्षल्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरु आहे. नक्षलवादी तेंदू कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलिस इंद्रावती नदीकाठावरील जंगलात पोहचताच नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. परंतु, नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन स्फोटके, वायर, बॅटऱ्या, पिट्टू, पुस्तके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सतर्कता बाळगून नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news