छत्रपती संभाजीनगर
छ.संभाजीनगर: पैठण तहसील कार्यालयावर मच्छीमारांचा मोर्चा
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणावर १५ एकर पाणलोट क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज (दि.९) सकाळी पैठण येथील तहसील कार्यालयावर अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कहार, भोई, भिल्ल समाजाच्या नागरिकांनी मुलाबाळांसह भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये दोन्ही जिल्ह्यातील जवळपास १५ हजारहून अधिक मच्छीमार सहभागी झाले होते.
यावेळी नागरिकांनी गळ्यात खेकड्यांच्या माळा घातल्या होत्या. तर हातात मासे घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
हेही वाचा

