छ.संभाजीनगर: जालना लाठीमार घटनेचे कन्नड तालुक्यात संतप्त पडसाद | पुढारी

छ.संभाजीनगर: जालना लाठीमार घटनेचे कन्नड तालुक्यात संतप्त पडसाद

नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील नाचनवेल आडगाव (पी.)टाकळी, मोहरा, डोंगरगाव, कोपरवेल, आमदाबाद, सारोळा, मोहाडी, जवखेडा या गावात सकल मराठा समाजाच्या वतीने नाचनवेल चौफुली येथे जालना घटनेच्या निषेधार्थ आज (दि. ३) सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन केले. यावेळी जमलेल्या शेकडो आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने ५३ मोर्चे काढण्यात आले होते. या शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाची दखल जगाने घेतली होती. पण मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी कन्नडच्या नायब तहसीलदार मोनाली सोनवणे व पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा 

Back to top button