Nashik Crime : सासऱ्याला भोसकणाऱ्या जावयाला अखेर अटक | पुढारी

Nashik Crime : सासऱ्याला भोसकणाऱ्या जावयाला अखेर अटक

सातपूर (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील प्रबुद्धनगरमध्ये कौटुंबिक वादातून सासऱ्यावर चाकूहल्ला करीत त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जावयाला अखेर पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटण्यात यशस्वी ठरत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील प्रबुद्धनगर येथील एका कुटुंबात दिलीप सखाराम वाटोरे (६०) यांच्या मुलीला जावई देवीदास कांबळे (गोरेगाव, हिंगोली) वारंवार त्रास देत असल्याने त्यांनी आपल्या मुलीला माहेरी म्हणजेच नाशिकला आणले होते. परंतु जावयाने तो राग मनात धरून दि. ४ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे येऊन पत्नी व सासरच्या मंडळींशी वाद घातला आणि चाकूने सासर्‍यावर वार करत गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले होते. त्या हल्ल्यात सासरा गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. १३ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सातपूर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर आरोपीचा शोध सुरू होता. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तपास करून आरोपीचा शोध घेऊन गुरुवारी (दि. १९) सातपूरमधून येथून सापळा रचत ताब्यात घेतले. खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केलेली आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button