‘वीर सावरकर सिक्रेट फाईल्स’ हिंदी वेबसीरिज येतेय भेटीला | पुढारी

'वीर सावरकर सिक्रेट फाईल्स' हिंदी वेबसीरिज येतेय भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ झाला. भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला.यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते डॉ. अनिर्बान सरकार, अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या – 

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले,” सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सावरकर यांच्या जीवन प्रवासातून लोकांनी प्रेरणा घ्यावी. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

सोमण म्हणाले की, आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले परंतु वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे.

Back to top button