Alia Bhatt National Award : पुरस्कारावेळी आलियाने लग्नाची साडी नेसली; खास कारण समोर | पुढारी

Alia Bhatt National Award : पुरस्कारावेळी आलियाने लग्नाची साडी नेसली; खास कारण समोर

र्पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ( Alia Bhatt National Award ) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दमदार हजेरी लावली. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्काराचे आयोजन नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केले होते. दरम्यान, आलियाने या पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या लग्नातील साडीची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. यानंतर आलियाने लग्नातील साडीच का परिधान केली असल्याचे कारण समोर आलं आहे.

संबधित बातम्या 

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टसोबत साऊथ स्टार अल्लू अर्जुन, रणबीर कपूर आणि क्रिती सेनॉन याच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. दरम्यान आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील गंगूबाईच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अनेक स्टार्संनादेखील यावेळी वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले आहेत.

दरम्यान या सोहळ्यात आलियाने तिच्या लग्नातील व्हाईट रंगाच्या साडी परिधान केल्याने सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. या साडीवर गोल्डन कलरची डिझाईन आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याच्या हस्ते आलिया पुरस्कार स्विकारताना खूपच ग्लॅमरस दिसली. दरम्यान तिने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि पती रणबीर कपूरसोबतही फोटो शेअर केले आहे. आलियाचे हे साडीतील फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकचे भऱभरून कौतुक केलं. तर दुसरीकडे आलियाने या सोहळ्यासाठी दुसरा कोणता तरी ड्रेस निवडला असता, तिने लग्नातील साडीच का नेसली आहे? अशा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावर अलियाने सोशल मीडियावर कारण स्पष्ट केलं आहे.

या खास सोहळ्यासाठी आलियाने लग्नातील साडीच का परिधान केली? याचे कारण स्पष्ट करताना इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘खास दिवसासाठी एक खास वेशभूषा असावी. आणि काहीवेळा तो पोशाख तुमच्याबरोबर असतो. जे एकदा खास होते ते पुन्हा- पुन्हा खास असू शकते… #rewear #reuse #repeat..’. असे लिहिले आहे. यावरून आलियाने लग्न आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळा तिच्या खास असल्याचे म्हटंले आहे. तर आलिया लवकरच २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘जिगरा’ या चित्रपटात दिसणार आहे. ( Alia Bhatt National Award )

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Back to top button