Alia Bhatt : आलिया भट्ट प्रथमच सुपर एजंटच्या भूमिकेत

alia bhatt
alia bhatt

पुढारी ऑनलाईन : यश राज यांच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटात आता आलिया भट्ट ( Alia Bhatt ) भूमिका साकारणार आहे. यात आलियाची सुपर एजेंटची भूमिका असेल आणि हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकेल, अशी अटकळ आहे. यापूर्वी टायगर फ्रेंचायझीत सलमान खान व कॅटरिना कैफसह 'एक था टायगर' (२०१२) व 'टायगर जिंदा है' (२०१७) असे चित्रपट दिले आणि त्यानंतर ऋतिक रोशन व टायगर श्रॉफ यांची भूमिका असलेल्या 'वॉर' चित्रपटाच्या माध्यमातून कायम ठेवला.

'पठाण हा युनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट या वर्षांतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ठरला. यात शाहरुख, दीपिका व जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. आलिया आता सुपरस्टार्सपैकी एक असून शाहरुख खान, सलमान खान व ऋतिक रोशन यांच्याप्रमाणेच ती सुपर एजंट म्हणून भूमिका साकारेल, असे स्पष्ट झाले आहे.

आदित्य चोप्रा या चित्रपटाचा दिग्दर्शक असून आलिया निश्चतपणाने या भूमिकेला न्याय देईल, याची त्याला खात्री वाटते. स्पाय युनिव्हर्समध्ये तूर्तास 'टायगर – ३' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात ऋतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर व कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ( Alia Bhatt )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news