69th National Film Awards : प्रतीक्षा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची! आज होणार घोषणा | पुढारी

69th National Film Awards : प्रतीक्षा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची! आज होणार घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २४ ऑगस्ट रोजी सायंका‍ळी ५ वाजता होणार आहे. ही घोषणा ज्युरी मेंबर्स करतील. (69th National Film Awards) विजेत्यांच्या नावांची घोषणा आज, २४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. जोजू जॉर्ज, आलिया भट्ट आणि कंगना राणौत सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या स्पर्धेत आहेत. ‘नायट्टू’, ‘मिनल मुरली’ आणि ‘मेप्पडियन’ असे अनेक मल्याळम चित्रपट प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी प्रबळ दावेदार आहेत. (69th National Film Awards)

आर माधवन दिग्दर्शित ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ हा विविध श्रेणींमध्ये आणखी एक पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार चित्रपट आहे. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळू शकतो. बॅसिल जोसेफ दिग्दर्शित ‘मिनल मुरली’ हादेखील दक्षिण चित्रपट स्पर्धेत आहे. दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराच्या शर्यतीत अनुक्रमे आलिया भट्ट आणि कंगना राणौत ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘थलाईवी’ आहेत.

अल्लू अर्जुनचा पुष्पा १ आणि आरआरआर हा चित्रपटदेखील पुरस्कारांच्या स्पर्धेत असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

Back to top button