Israel-Hamas war : इस्रायल-हमास युद्धासंदर्भात इस्लामिक देशांनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता? | पुढारी

Israel-Hamas war : इस्रायल-हमास युद्धासंदर्भात इस्लामिक देशांनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्लामिक देशांचा सर्वोच्च गट असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (OIC) इस्रायल-हमास युद्धावर चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. या गटात ५७ इस्लामिक देशांचा समावेश असून  इस्लामिक शिखर परिषदेच्या सध्याच्या सत्राचे अध्यक्षस्थान असलेल्या सौदी अरेबियाने बुधवारी जेद्दाह येथे होणाऱ्या बैठकीसाठी सदस्य देशांना आमंत्रित केले आहे. या बैठकीत युद्धासंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

संबंधित बातम्या : 

सौदी अरेबियाच्या निमंत्रणावरून, संघटनेची कार्यकारी समिती गाझा पट्टीत हाताबाहेर चाललेली लष्करी परिस्थितीवर उपाय करण्यासाठी मंत्रिस्तरीय तातडीची खुली बैठक बोलावत आहे, असे OIC ने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. ओआयसी ही चार खंडांमध्ये पसरलेल्या ५७ देशांचे सदस्यत्व असलेली संयुक्त राष्ट्रांनंतरची दुसरी सर्वात मोठी संस्था आहे. ती स्वतःला मुस्लिम देशांचा सामूहिक आवाज म्हणून वर्णन करते. ज्या दिवशी सौदी अरेबियाने इस्रायलशी संभाव्य संबंध सामान्य करण्याबाबत चर्चा स्थगित केली त्या दिवशी ओआयसीच्या तातडीच्या बैठकीचे आवाहन करण्यात आले.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला, यात १३०० हून अधिक नागरिक ठार झाले. याला प्रत्युत्तर देत इस्रायलनेही हल्ला केला. यामध्ये गाझा पट्टीमध्ये किमान २,२१५ लोक मारले गेले. याशिवाय दोन्ही ठिकाणी हजारो लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडून दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी या भागातून पलायन केले. त्याचवेळी, इजिप्शियन अधिका-यांनी सांगितले की, परदेशी नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यासाठी दक्षिणी रफाह सीमा अनेक दिवसांत प्रथमच शनिवारनंतर उघडेल. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पॅलेस्टिनी दोन मुख्य मार्गांवर सुरक्षितपणे प्रवास करू शकतात, असे इस्रायलने म्हटले आहे. शुक्रवारी इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, लोकांनी कार, ट्रकमधून दक्षिणेकडील मुख्य रस्त्यांकडे धाव घेतली. हमासने मात्र गाझा रहिवाशांना त्यांच्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान. हजारो पॅलेस्टिनी आधीच दक्षिणेकडे पळून गेले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button