Israel-Hamas war news: एअर स्ट्राईकनंतर आता जमिनीवर लढाई?; नागरिकांना गाझा सोडण्याचा इस्रायलचा इशारा | पुढारी

Israel-Hamas war news: एअर स्ट्राईकनंतर आता जमिनीवर लढाई?; नागरिकांना गाझा सोडण्याचा इस्रायलचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: हमास संघटनेकडून इस्रायलमध्ये नरसंहार सुरूच आहे. दरम्यान इस्रायलने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. संघर्ष सुरू राहिल्या हवाई हल्ल्यानंतर आता तर आघाड्यांवरही युद्ध सुरू होऊ शकते. त्यामुळे इस्रायलने सैन्याने आणखी लाखो गाझा वासियांना त्यांचा भाग सोडण्याचा इशारा दिला आहे. (Israel-Hamas war news)

UN कडून  ‘विनाशकारी’ परिणामांची चेतावणी

हमास आणि इस्रायलमधील संघर्षाचा आज सहावा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार संघर्ष सुरूच आहे. यामध्ये आतापर्यंत १५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, हजारो नागरिक जखमी झालेत, तर १५० हून अधिक नागरिकांना ओलिस ठेवले आहे. दरम्यान २४ तासाच्या आत गाझा पट्टीतील ११ लाख नागरिकांना बाहेर काढण्याचे आदेश इस्रायल सरकारकडून देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्राने देखील ‘विनाशकारी’ परिणामांची चेतावणी दिली आहे. (Israel-Hamas war news)

 एअर स्ट्राईकनंतर आता जमिनीवर युद्धारंभ?

हमासला हवाई हल्ल्यामधून दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर इस्रायल अमेरिकेच्या मदतीने पॅलेस्टिनमधील गाझा प्रदेशावर संभाव्य जमिनीवर आक्रमण करण्याची तयारी करत आहे. इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी याची पुष्टी केली. गाझा शहरातील रहिवाशांना दक्षिणेकडे स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी त्यांना इस्रायली लष्कराने सूचित केले होते की गाझाच्या उत्तरेकडील संपूर्ण लोकसंख्या पुढील 24 तासांत दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित झाली पाहिजे, असे गाझामध्ये काम करणार्‍या संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. (Israel-Hamas war news)

हमास इस्रायल संघर्षात अमेरिका इस्रायलसोबत

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांची भेटी झाली. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र ब्लिंकन यांनी हमास इस्रायल संघर्षात इस्रायलसोबत असल्याचे स्पष्ट केले. या भेटीदरम्यान इस्रायलने येथील मृत मुले आणि नागरिकांच्या सध्यस्थितीच्या प्रतिमा नाटो संरक्षण मंत्र्यांला दाखवल्या आणि ते हमासने मारले असल्याचे सांगितले. यानंतर इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने पावले उतलण्यास सुरूवात केली आहे. (Israel-Hamas war news)

हेही वाचा:

Back to top button