आरक्षणासाठी एकजुटीने रस्त्यावरची लढाई सुरुच ठेवा : आमदार गोपीचंद पडळकर | पुढारी

आरक्षणासाठी एकजुटीने रस्त्यावरची लढाई सुरुच ठेवा : आमदार गोपीचंद पडळकर

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  घरात बसून आरक्षण मिळणार नाही. आता सर्वानी बाहेर पडून आंदोलने करुन महाराष्ट्रात धनगर समाजाची ताकद दाखवा, असे सांगतानाच धनगर आरक्षणचा लढा उभारला की, एन.टी.चे पिल्लू बाहेर काढण्याचे षडयंञ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रचत असल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. तालुक्यातील भानसहिवरे येथील शिवमल्हार मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.13) दुपारी 4 वाजता सकल धनगर समाजातर्फे आयोजित जागर यात्रा मेळाव्यात आमदार पडळकर बोलत होते. धनगर आरक्षणासाठी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली असून शपथत्रही दाखल करण्यात आले. आपण आरक्षणाच्या जवळ आलो आहोत. मात्र समाजाने एकजूट दाखविण्याची गरज असून, घरात बसून आरक्षण मिळणार नाही.

संबंधित बातम्या : 

त्यामुळे रस्त्यावरची लढाईही सुरूच ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याला आरक्षण मिळणार असल्याचा ठाम विश्वासही यावेळी पडळकर यांनी व्यक्त केला. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसून, धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊन मग इतर आदिवासी जमातीचे केवळ दहा टक्के लोकच या आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे इतर अन्यायग्रस्त जमातीला आरक्षण मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे यावेळी आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आमदार पडळकर यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, आरक्षणाची चळवळ चालू झाली की,पवार षडयंञ रचून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.

धनगर आरक्षण मिळणारच
एक लाख टक्के धनगर समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आशावाद आमदार पडळकर यांनी व्यक्त केला. रस्त्यावरची लढाईही सुरुच ठेवून धनगरी ताकद दाखविण्याचे आवाहन करीत समाजाला एकत्र येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Back to top button