Nana Patekar : ‘मी मुळात मवाली आणि गुंड प्रवृत्तीचा होतो : नाना पाटेकरांनी दिला आठवणींना उजाळा | पुढारी

Nana Patekar : ‘मी मुळात मवाली आणि गुंड प्रवृत्तीचा होतो : नाना पाटेकरांनी दिला आठवणींना उजाळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘मी माझ्या चेहर्‍यासोबत आणि स्वभावासोबत 50 वर्षे चित्रपट क्षेत्रात टिकून आहे. मला कोणाशी मिळते-जुळते घेणे जमले नाही. यातून माणसे दुरावली, हातून चित्रपट गेले. पण, त्याची मला खंत नाही. मला माझ्याप्रमाणे जगता आले हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी (दि. 13) व्यक्त केली.

राजहंस प्रकाशनातर्फे आयोजित एका विशेष कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील, दत्तात्रय पाडेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आदी उपस्थित होते. ‘मी मुळात मवाली आणि गुंड प्रवृत्तीचा होतो. मी त्या व्यवसायात जाऊ नये म्हणून मला आणि माझ्या भावाला घेऊन आई गावी मुरुड – जंजिर्‍याला आली. म्हणून माझ्या हातात चित्रकलेचा ब—श आला,’ अशी आठवणही पाटेकर यांनी सांगितली. ‘पूर्वी जे कला महाविद्यालयात कलेचे वातावरण असायचे ते आज दिसत नाही.’

हेही वाचा

निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील

Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा! उपाययोजना सोडा, पर्यावरण अहवालही नाही

Lalit Patil Drug Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात हवालामार्फत व्यवहार ?

Back to top button