दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यास न्यायालयात जाणार : अनिल परब | पुढारी

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यास न्यायालयात जाणार : अनिल परब

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी आम्ही महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. आमचे पत्र दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे पत्र रजिस्टरमध्ये घुसविण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रश्नावर
प्रसंगी आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी सोमवारी दिला.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट आणि शिदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी पत्र पाठविले आहे. गेल्यावर्षी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. यासंदर्भात अनिल परब म्हणाले की, दसरा मेळाव्याची आमची परंपरा आहे. गेल्यावर्षीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यावर्षीही आम्ही ७ ऑगस्टला पत्र दिले. त्यानंतर ३ ऑक्टोबरला स्मरणपत्र दिले. मात्र, दोन महिने झाले तरी या पत्राला प्रतिसाद मिळाला नाही

Back to top button