१९ वर्षांची विद्यार्थिनी २७ आठवड्यांच्या गर्भपातासाठी हायकोर्टात

१९ वर्षांची विद्यार्थिनी २७ आठवड्यांच्या गर्भपातासाठी हायकोर्टात
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या १९ वर्षाच्या गर्भवती विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मला २७ आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी द्या अशी विनंती तिने हायकोर्टाला केली. याची गंभीर दखल घेत सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाला तातडीने उद्या २८ मे ला अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी २९ मेला निश्चित केली.

आमचे प्रेमसंबंध असून नोव्हेंबरमध्ये आमचे शारीरिक संबंध घडून आले. त्यातच आपण गर्भवती असल्याचे समजले. मात्र आई वडिलांच्या भीतीपोटी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. माझ्यात झालेल्या बदलामुळे ही गोष्ट आईला समजली. त्यानंतर ससून रूग्णालयात तपासणी केल्यानंतर २५ आठवडे गर्भवती असल्याचे उघड झाले. गरोदरपणाचे परिणाम समजत नाहीत, त्याचे परिणाम स्वतःवर आणि गर्भातील बाळावर होऊ शकतात. मला पुढील शिक्षण घ्यायचे असल्याचे या मुलीने याचिकेत म्हटले आहे. नियमानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका मुलीने उच्च न्यायालयात दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील अॅड. कविता साळुंके यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला. वैद्यकीय अहवाला नुसार गर्भाची वाढ होत असून गर्भ सशक्त आहे. तसेच मुलीची बाळाला जन्म देण्याची आणि त्याला दत्तक देण्याची तयारी आहे. असे असताना गर्भपात करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली. मात्र, खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी २९ मे रोजी निश्चित केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news