रत्नागिरी: कशेडी बोगद्यातून पाच दिवसांनंतर वाहतूक बंद होणार | पुढारी

रत्नागिरी: कशेडी बोगद्यातून पाच दिवसांनंतर वाहतूक बंद होणार

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करणार आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आलेली वाहतूक चार ते पाच दिवसात बंद करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या उर्वरित कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारी २०२४ पर्यंत कशेडी बोगदा व त्यापर्यंत पोहोचण्याच्या दोन्ही मार्गिका पूर्ण करून तेथून वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी पुढारीसोबत बोलताना सांगितले.

हेही वाचा :

Back to top button