सांगली : शिराळा येथे तरूणाचे अपहरण करून गंभीर मारहाण | पुढारी

सांगली : शिराळा येथे तरूणाचे अपहरण करून गंभीर मारहाण

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : येथील ओंकार भगवान पाटील याचे मोटरसायकलवरून अपहरण करून मारहाण केली. प्रकरणी संशयित आरोपी शुभम मानसिंग खबाले व धैर्यशील खबाले (रा. खेड ता शिराळा) यांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री घडली.

याबाबत शिराळा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिराळा येथील तळीचा कोपरा येथे फिर्यादी ओंकार भगवान पाटील हा उदय कदम यांच्या घरात भाड्याने राहतो. या ठिकाणी आरोपी शुभम मानसिंग कदम व धैर्यशील खबाले या दोघांनी घरासमोर बुधवारी रात्री फिर्यादीला मोटरसायकलवरून अपहरण केले.

आमचा मित्र संग्राम कुरणे हा तुझ्यामुळेच मेला, आमच्या घराची तू वाट लावलीस, असे म्हणत शिराळा औद्योगिक वसाहतीमधील जनावराच्या शेडमध्ये दांडक्याने दोघांनी रात्रभर ओंकारला मारहाण केली. या प्रकरणी संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही . या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. जी. पाटील करत आहे.

हेही वाचा :

Back to top button