Maharashtra SSC 10th Results 2024 | दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, सोप्या ‘या’ ५ स्टेप्स, पाहा तुमचा निकाल | पुढारी

Maharashtra SSC 10th Results 2024 | दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, सोप्या 'या' ५ स्टेप्स, पाहा तुमचा निकाल

 पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल सोमवारी (दि.२७) जाहीर करण्यात आला. राज्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ टक्के एवढी आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

  • राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के
  • यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.०१ टक्के निकाल लागला आहे
  • नागपूर विभागाचा सर्वात कमी ९४.७३ टक्के निकाल

बारावीचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकपासून विषयनिहाय संपादित केलेले गुण निकालाद्वारे पाहता येणार आहेत. त्याची प्रिंटदेखील काढून घेता येणार आहे. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

विभागवार निकाल

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून एकुण १५ लाख ६० हजार नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी होती. तर १५ लाख ४९ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

  • पुणे – ९६.४४ टक्के
  • नागपूर – ९४.७३ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर – ९५.१९ टक्के
  • मुंबई – ९५.८३ टक्के
  • कोल्हापूर -९७.४५ टक्के
  • अमरावती – ९५.५८ टक्के
  • नाशिक – ९५.२८ टक्के
  • लातूर – ९५.२७ टक्के
  • कोकण – ९९.०१ टक्के
  • एकूण – ९५. ८१ टक्के
ssc result
ssc result

यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

नुकताच दहावीचा निकाल लागला, राज्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ टक्के एवढी आहे. या निकालात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९७.२१ टक्के तर मुलांची टक्केवारी ९४.५६ टक्के लागला असून,  यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ५१ टक्के

यंदा २५,७७० रिपीटर विद्यार्थ्यांची नोंदणी होती. तर २५,३२७ परीक्षेला बसले होती. रिपीटर विद्यार्थ्यांपैकी १२,९५८ विद्यार्थी उतीर्ण झाले.  रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ५१ टक्के लागला आहे.

या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल

असा पाहा निकाल

वर दिलेल्या अधिकृत लिंकवर तुमचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी खालील टीप्स फॉलो करा

  • प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा
  • स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा
  • थोड्या वेळात तुमचं निकाल दिसेल
  • निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची छापील प्रत काढून घ्या.
  • विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे

गुणपडताळणी

ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार आहे किंवा तुम्ही तुमच्या शाळांमार्फतही अर्ज करु शकता. Maharashtra SSC 10th Results 2024

ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.

हेही वाचा 

Back to top button