पनवेल : महापालिकेच्या आवाहनाला पोलिसांचा प्रतिसाद; पोलीस ठाण्यातील गणेश मुर्ती केली दान | पुढारी

पनवेल : महापालिकेच्या आवाहनाला पोलिसांचा प्रतिसाद; पोलीस ठाण्यातील गणेश मुर्ती केली दान

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलप्रदूषण टाळण्यासाठी मुर्तीदान संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला पनवेलकरांनी उत्तम प्रतिसाद देत शेकडो मुर्तीदान करून पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. या आवाहनाला पनवेल शहर पोलिसांनीदेखील प्रतिसाद देऊन आज (दि.२९) पोलीस ठाण्यातील गणेश  मुर्तीचे दान केले.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी पोलीस ठाण्यातील गणेश मुर्तीदान करण्याचा संकल्प केला. या अनुषंगाने अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी (दि.२९) सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक रजपुत यांच्या उपस्थितीत ठाण्यातील गणेस मुर्ती वाजत गाजत पालिकेला दान केला. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे आभार मानले. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पनवेलचे सहाय्यक पोलीस उपायुक्त राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी ही हिंदी गाण्याचा ताल धरत नुत्य केले.

हेही वाचा :

Back to top button