Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवसाची ‘सोनेरी’ सुरुवात; ऐश्वर्य, स्वप्निल आणि अखिलने नेमबाजीत घेतला सुवर्णवेध | पुढारी

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवसाची 'सोनेरी' सुरुवात; ऐश्वर्य, स्वप्निल आणि अखिलने नेमबाजीत घेतला सुवर्णवेध

पुढारी ऑनलाइन डेस्क : Asian Games 2023 : आशिया क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताची आज शुक्रवारी सोनेरी सुरुवात झाली. 50 मीटर रायफल नेमबाजीत पुरुषांच्या संघाने भारताला सातवे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या त्रिकुटाने शूटिंगमध्ये कमाल केली. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिघांनी मिळून १७६९ गुण मिळवले. चीनच्या लिनशु, हाओ आणि जिया मिंग या जोडीला रौप्यपदक मिळाले. त्याचवेळी कोरियाच्या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले.

संबंधित बातम्या :

10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले

पुरुष संघाच्या सोनेरी सुरुवातसह महिलांनी देखील उत्तम कामगिरीकरत रौप्यपदक पटकावले आहे. भारताने 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारतीय महिला संघाच्या खेळाडू ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. या तिघींनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चालू आवृत्तीत देशाला 26 वे पदक मिळवून दिले. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांचा संघ १७३१-५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनच्या रँक्सिंग, ली आणि नान या जोडीने सुवर्णपदक पटकावले.

Asian Games 2023 : भारताची एकूण पदक संख्या 27

पाचव्या दिवशी भारत सहा सुवर्ण, आठ रौप्य आणि 11 कांस्यपदकांसह पाचव्या स्थानावर होता. त्याच्या खात्यात एकूण 25 पदके होती. शुक्रवारी महिला सांघिक नेमबाजी स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळाले. त्याचवेळी पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकून गौरव केला. यासह एकूण पदकांची संख्या आता 27 झाली आहे.

हे ही वाचा :

Hangzhou 2022 Asian Games | हॉकीत भारतीय महिलांनी सिंगापूरचा उडवला धुव्वा, डागले १३ गोल, संगिता कुमारीची हॅट्ट्रिक

Asian Games 2023 Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाची सुवर्णपदकाला गवसणी, श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव

Back to top button