Asian Games 2023 | नेमबाजीत भारताचा दबदबा कायम; १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक | पुढारी

Asian Games 2023 | नेमबाजीत भारताचा दबदबा कायम; १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आशियाई क्रीडा २०२३ मध्ये  नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. भारताला सहावे सुवर्णपदक मिळाले आहे.  १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग आणि शिव नरवाल हे सुवर्ण भारताला मिळवून दिले आहे. भारतीय त्रिकुटाने १७३४ गुण मिळवले आहे. तर चीनला १७३३ गुणांसह रौप्यपदक मिळाले आहे. (Asian Games 2023 )भारतीय संघाने रौप्यपदक मिळवणाऱ्या चीनपेक्षा एक गुण पुढे केला. नेमबाजीतील हे चौथे सुवर्णपदक आणि सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील एकूण सहावे सुवर्णपदक आहे

सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सरबज्योत सिंग आणि अर्जुन चीमा या  जोडीनेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सरबज्योत ५८० गुणांसह ५व्या तर अर्जुन  ५७८ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. शिवाने ५७६ गुण मिळवले आणि त्याला १४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर रोशिबिनाने वुशु खेळप्रकारात 60 किलो गटात चमकदार कामगिरी करत  रौप्य पदक जिंकले

संबधित बातम्या

चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होत आहेत. या कालावधीत ४० खेळांमध्ये एकूण ४८२ स्पर्धा होत आहेत. ज्यात १०,००० हून अधिक ४५ देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत  भारतीय टीमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या नावे आता नेमबाजीत चार सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी १३ पदके आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नावावर आतापर्यंत २३ पदके आहेत.

Back to top button