Asian Games 2023 | नेमबाजीत पदकांची लयलूट, भारताच्या सिफ्ट कौर समराचा जागतिक विक्रमासह सुवर्णवेध | पुढारी

Asian Games 2023 | नेमबाजीत पदकांची लयलूट, भारताच्या सिफ्ट कौर समराचा जागतिक विक्रमासह सुवर्णवेध

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची खेळांडूकडून पदकांची लयलूट कायम आहे. भारताच्या सिफ्ट कौर समराने ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत सुवर्ण आणि आशी चौकसेने कांस्यपदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी नेमबाजीत दमदार सुरुवात केली. भारताची नेमबाज सिफ्ट कौर समराने वैयक्तिकरित्या यश मिळवले आहे. तिने  50-मीटर रायफल पोझिशन्स वैयक्तिक इव्हेंटमध्ये प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुवर्णपदकासह तिने जागतिक विक्रमही केला आहे. सिफ्ट कौर समरा हिने १०.२ च्या शेवटच्या शॉटनंतर ४६९.६ गुणांसह जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, आज पुरुषांच्या स्कीट सांघिक स्पर्धेत भारताने कांस्यपदक जिंकले आहे. (Asian Games 2023)

त्याचबरोबर सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी ५० मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

संबधित बातम्या

याआधी आज  मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने नेमबाजीत देशाचे वर्चस्व कायम ठेवत चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर भारताच्या सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी ५० मीटर रायफल ३ पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.

याआधी दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंह तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. तसेच महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौकसे यांना सांघिक रौप्यपदक मिळाले.

चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होत आहेत. या कालावधीत ४० खेळांमध्ये एकूण ४८२ स्पर्धा होत आहेत. ज्यात १०,००० हून अधिक ४५ देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज चौथा दिवस. सलग चौथ्या दिवशी भारतीय टीमने चांगली कामगिरी केली आहे.

Back to top button