Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा कंटेनर उलटला | पुढारी

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा कंटेनर उलटला

नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ नजीक घरगुती वापराची गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा कंटेनर उलटला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन क्रेनच्या साहाय्याने अवजड कंटेनरला बाजूला घेत असताना देखील साखळी तुटली आहे. गॅस गळती होऊन दुर्घटना घडू नये यासाठी कंटेनरला बाजूला घेण्याचे काम सध्या सुरु आहे.

पुणे-सातारा महामार्ग येथील कापूरहोळनजीक हरिश्चंद्री (ता. भोर) येथे साताऱ्याच्या दिशेने जात असताना कंटेनर (एमएच ३१ एफसी ४०२२ बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उलटला. कंटेनरमध्ये जवळपास ३२ टन गॅस सिलेंडर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मुंबई (चेंबूर) येथून भारत कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन महामार्गावरून साताराच्या दिशेने वाईकडे जात होता. दरम्यान, महामार्गावर कार चालकाला वाचवताना कंटेनर चालक अब्दुल वाजिद याचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटून महामार्ग रस्ता सोडून सेवा रस्त्यावर लांबपर्यंत घासत गेला. कंटेनर सिलेंडर गॅसने भरलेले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. महामार्ग वाहतूक पोलीस, किकवी दूरक्षेत्राचे पोलीस, भारत गॅसचे अधिकारी, भोर नगरपालिकेचे अग्नीशामक दल, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले असून सध्या चार क्रेनच्या साह्याने कंटेनरला बाजूला घेण्याचे युद्धपातळीवर काम सुरु आहे.

अन्यथा दहा किमीपर्यत सर्व खाक झाले असते

गॅस सिलिंडरने भरलेला हा कंटेनर महामार्गावर जोरदार पालटल्यावर कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकली असती. सिलिंडर गळती होऊन जवळपास १० कि.मी. पर्यत सर्व खाक झाले असते अशी भीती यावेळी व्यक्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून कंटेनर बाजूला घेताना मोठी सावधगिरी बाळगले जात आहे.

हेही वाचा

Sharad Pawar News : पवारांच्या दौर्‍याने जुन्नरला चौथा उमेदवार मिळणार !

नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान नव्‍हते : कर्नाटक भाजप आमदारांच्‍या विधानाने नवा वाद

Ashwin Dani passes away | एशियन पेंट्सचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे निधन

Back to top button