नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान नव्‍हते : कर्नाटक भाजप आमदारांच्‍या विधानाने नवा वाद | पुढारी

नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान नव्‍हते : कर्नाटक भाजप आमदारांच्‍या विधानाने नवा वाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते, असे मतकर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा पाटील यांनी एका जाहीर सभेत म्‍हटले. त्‍यांच्‍या या विधानमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना भाजप आमदार म्हणाले, उपासमारीच्या आंदोलनांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही, आम्हाला ते मिळाले नाही कारण आम्ही एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करु असे म्‍हणत असू, त्‍यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या भीतीमुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. 

सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान

” जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान नव्हते, तर भारताचे पहिले पंतप्रधान हे सुभाषचंद्र बोस होते. केवळ सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्‍या भीतीमुळे ब्रिटिशांनी भारत सोडला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश भारत सोडून निघून गेले. तेव्‍हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. तेव्‍हा देशाच्या काही भागात स्वातंत्र्य घोषित झाले होते. त्यांचे स्वतःचे चलन, ध्वज आणि राष्ट्रगीत होते, असेही बसनगौडा पाटील यांनी म्‍हटले आहे.


बसनगौडा पाटील हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ऑगस्टमध्ये ते म्हणाले होते की, कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसचे सरकार सहा ते सात महिन्यांत कोसळेल.

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button