Washim News : दरोड्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

Washim News : दरोड्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 वाशिम, पुढारी वृत्तसेवा : घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० दरोडेखोरांची टाेळी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली.  दरोडेखोरांकडून लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले. एक चारचाकी, १३ दुचाकी, सात मोबाईल फाेन असा  १३,०६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पाेलीस ठाण्‍यात  गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रामकृष्ण महल्ले यांना सोमवारी माहिती मिळाली की, ग्राम पांगरी धनकुटे ते काटा रोड वरील रेल्वे पुलासमोर काही व्यक्ती संशयितरीत्या बसले आहेत. कारवाईसाठी  स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आली. पाेलिसांनी घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्‍यात घेतले. यावेळी काही जण अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारामध्ये पळून गेले.

 विनोद मच्छिंद्र चव्हाण (वय ३०), शुभम अनंता चव्हाण (२०), आकाश नामदेव काकडे (२४), गौतम भगवान गायकवाड ( ३८), संदीप मच्छिंद्र चव्हाण ( ४०) पाच जण रा.डव्हा, ता.मालेगाव, जि.वाशिम) राहुल विश्वास पवार (२२ रा.सुदी, ता. मालेगाव, जि.वाशिम), रवी डीगांबर पवार (वय २८, रा.आमखेडा, ता.मालेगाव, जि.वाशिम), लक्ष्मण भागवत चव्हाण (वय ४९ रा. धारकाटा, ता. मालेगाव, जि. वाशिम) विशाल जगदीश पवार (२१)  राधेश्याम चुनिलाल पवार ( २९ रा.सावरगाव बर्डे, ता.मालेगाव, जि. वाशिम ) अशी अटक केलेल्‍या दराेडेखाेरांची नावे आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्राषक मकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि रमाकांत खंदारे, जगदीश बांगर, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.बाळू कंकाळ, गजानन अवगळे, गजानन झगरे, दिपक सोनवणे, कविता गायकवाड, पोना. प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, राजेश राठोड, ज्ञानदेव मात्रे, प्रवीण राऊत, राम नागुलकर, गजानन गोटे, महेश वानखेडे, संगीता शिंदे, पोशि. निलेश इंगळे, अविनाश वाढे, विठ्ठल सुर्वे, शुभम चौधरी, विठ्ठल महाले, दीपक घुगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी पार पाडली. 
हेही वाचा 

Back to top button