Actress Nithya Menen
Actress Nithya Menen

Actress Nithya Menen : सेटवर हिरोने नित्या मेननची केली सतावणूक? अभिनेत्रीने सांगितलं सत्य

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपट इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री नित्या मेननने सरर्व मीडिया रिपोर्ट विषयी सांगितले आहे. (Actress Nithya Menen) खरंतर, असा दावा करण्यात आला होता की, एका तमिळ अभिनेत्याने तिचा छ‍ळ केला आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरून एक रिपोर्ट शेअर करण्यात आली आहे, या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे की, नित्या मेननला एका तमिळ अभिनेत्याने त्रास दिला. हा रिपोर्ट व्हायरल झाल्यानंतर नित्या मेननने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Actress Nithya Menen)

नित्याच्या नावाने जे सांगण्यात आलं आहे की, त्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, तेलुगु इंडस्ट्रीमध्ये मला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. तमिळ इंडस्ट्रीमध्ये मला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागला. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका तमिळ हिरोने मला खूप त्रास दिला.

आता नित्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपट ट्रेड एक्सपर्ट मनोबाला विजयबालनने नित्याचे स्टेटमेंट शेअर केले आहे. यामध्ये नित्याने म्हटलंय की, तिच्याविषयी जे सांगितलं जात आहे, ते सर्व वृत्त निराधार आहेत आणि यांध्ये कोणतीही सत्यता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news