Jigra : आलिया भट्टच्या जिगरा चित्रपटाचा फर्स्ट लूक | पुढारी

Jigra : आलिया भट्टच्या जिगरा चित्रपटाचा फर्स्ट लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्टने आपला आगामी जिगरा चित्रपटाची घोषणा केलीय. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या यशानंतर आलियाने आपल्या आणखी एका चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आणला आहे. (Jigra ) या चित्रपटाने करण जोहर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा सोबत काम करणार आहेत. दोघे मिळून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट वसन बाला दिग्दर्शित करणार आहेत. (Jigra )

करण जोहर, आलिया भट्ट दोघांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये आलियाचा लूक दिसत आहे. बॅकग्राऊंडला एक व्हॉईस ओवर ऐकू येतो. असं वाटत आहे की, तो आपल्या छोट्या भाऊ वा बहिणीला म्हणत आहे की, ती त्यांना काहीही होऊ देणार नाही.

करण जोहरने शेअर केली पोस्ट

करण जोहरने पोस्ट शेअर करत लिहिले की- माझ्या जिगराची वापसी. आलिया भट्ट पुन्हा एकदा वसन बाला दिग्दर्शित असाधारण कहानी घेऊन येत आहे. अतूट प्रेम आणि अटूट साहसाची कहाणी. जिगरा २७ सप्टेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Back to top button