‘पश्मीना’ : गौरी तेजवाणी साकारणार कणखर प्रीतीची भूमिका

‘पश्मीना’ : गौरी तेजवाणी साकारणार कणखर प्रीतीची भूमिका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी सबवरील 'पश्मीना – धागे मोहब्बत के' ही नवी मालिका काश्मीरच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर बेतलेली एक सुंदर प्रेमकहाणी घेऊन येत आहे. श्रीनगर आणि गुलमर्गच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ही मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी छोट्या पडद्यावर एक देखणा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहे. पश्मीना आणि राघव या प्रमुख पात्रांची भूमिका अनुक्रमे ईशा शर्मा आणि निशांत मलकानी यांनी साकारली आहेत. ईशा आणि निशांत अगदी वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असले, तरी नियती त्या दोघांना एकत्र आणताना दिसणार आहे.

संबधित बातम्या 

या वेधक कथानकात गौरी तेजवाणी पश्मीनाची आई प्रीती सूरी हिची महत्त्वाची भूमिका करताना दिसणार आहे. प्रीती एक कणखर आणि स्वतंत्र स्त्री आहे आणि आपल्या मुलीला तिने नेहमीच खंबीर आधार दिलेला आहे. तिने आपल्या मुलीला दिलेल्या स्वावलंबनाच्या शिकवणीमुळे पश्मीना देखील आत्मनिर्भर झाली आहे आणि तिच्यात आत्मविश्वास आहे. प्रीती सूरी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असणार आहे, कारण तिचे निर्णय आणि कृती या दोन प्रेमी जिवांचे भवितव्य ठरवतील, त्यांच्या नात्याला दिशा देतील.

प्रीती सूरीची भूमिका करणारी गौरी तेजवाणी म्हटलं की, 'पश्मीना मालिकेत काम करण्याचा अनुभव अफलातून आहे, कारण काश्मीरच्या रमणीय पार्श्वभूमीवर या मालिकेत क्लासिक रोमान्सचे घटक सुंदररित्या गुंफले आहेत. या मालिकेची पटकथा खरोखर अनोखी आहे आणि अशा मालिकेसाठी सोनी सबसोबत काम करताना खूप आनंद होत आहे. काश्मीरच्या सुंदर परिसरात शूटिंग करताना माझ्या मनात लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यामुळे मला घरी परतल्यासारखे वाटते आहे. प्रीतीसारखी व्यक्तिरेखा, जिचा प्रेम या कल्पनेवर विश्वास आहे, पडद्यावर जिवंत करण्याचा अनुभव अनोखा आहे. मला मनोमन अशी आशा आहे की, प्रेक्षकांना देखील या मालिकेबद्दल अशीच उत्सुकता असेल. आणि माझ्याप्रमाणेच ते देखील या सुंदर प्रवासाचा आनंद घेतील.'

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news