जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराने उभा केला 70 फुटी ध्वज | पुढारी

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराने उभा केला 70 फुटी ध्वज

श्रीनगर; वृत्तसंस्था : भारतीय लष्कराने ‘फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडिया’च्या सहकार्याने जम्मू-काश्मीरच्या पूंछमधील अजोट वॉर मेमोरियल येथे गुरुवारी 70 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला.

‘सीडीआर 93 इन्फंट्री बि—गेड’चे बि—गेडियर राजेश बिश्त यांनी या ध्वजाचे लोकार्पण केले. त्यावेळी पूंछमधील उपायुक्त यासीन एम. चौधरी, पूंछचे जिल्हा विकास परिषदेचे अध्यक्ष ताझीम अख्तर, पूंछचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक विनय कुमार शर्मा आदींसह अनेक लोक उपस्थित होते. लष्कराच्या जवानांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तसेच जम्मू-काश्मीर पोलिसही या कार्यक्रमात सहभागी झाले. पूंछ जिल्ह्यातील तीन स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रगीताचे गायन केले.

Back to top button