धोनी हे भारताला लाभलेले वरदान : गौतम गंभीर | पुढारी

धोनी हे भारताला लाभलेले वरदान : गौतम गंभीर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  2011 मध्ये वन डे विश्वचषक भारताने जिंकला होता. या सामन्यात गौतम गंभीर (97) आणि महेंद्रसिंग धोनी (91 नाबाद) दोघे हीरो ठरले होते, पण निवृत्तीनंतर गंभीरने धोनीवर सातत्याने टीका केल्याचे दिसून आले. असे असताना आता गंभीरने धोनीबद्दल नवे विधान केले आहे, धोनी हे भारतीय संघाला लाभलेले वरदान होते, असे त्याने म्हटले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा सुरुवातीपासून एक असा विकेटकिपर होता, जो आपल्या फलंदाजीने सामन्याची दिशा बदलून टाकण्यास सक्षम होता. धोनीच्या आधीचे विकेटकिपर्स हे किपिंगसाठी ओळखले जायचे आणि त्यांना बॅटिंगही जमत असे, पण धोनी हा मूळत: फलंदाज होता जो किपिंगही चांगली करायचा. त्यामुळे धोनीसारखा खेळाडू संघात असणे हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच होते. धोनीच्या रूपाने भारताला एक असा खेळाडू मिळाला जो तुम्हाला सातव्या क्रमांकाला फलंदाजी करून सामने जिंकवून देईल, कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य होते, अशी स्तुती गौतम गंभीरने केली.

Back to top button