Libya flood | लिबियात नेमके पुरबळी किती?, UN ने सांगितला आकडा | पुढारी

Libya flood | लिबियात नेमके पुरबळी किती?, UN ने सांगितला आकडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्र संघाने लिबियातील पुरात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत आधीच्या तुलनेत बदल आहे.  संयुक्त राष्ट्राचे म्हणणं आहे की, लिबियातील डेरना शहरात आलेल्या पुरात ३,९५८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने मृतांची संख्या ११,३०० असल्याचे सांगितले होते. संयुक्त राष्ट्राने जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत ही ताजी आकडेवारी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ९,००० लोक अजूनही बेपत्ता आहेत. (Libya flood)

संबधित बातम्या

संयुक्त राष्ट्रांनी दुरुस्तीचे कारण केले स्पष्ट

संयुक्त राष्ट्राने लिबियन रेड क्रिसेंटचा हवाला देत यापूर्वी मृतांची संख्या ११,३०० असल्याचे सांगितले होते. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस फरहान हक म्हणाले की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीचीही पुष्टी करत आहोत. त्याचवेळी, लिबियन रेड क्रिसेंटने सांगितले की त्यांनी मृतांचा इतका मोठा आकडा कधीच जाहीर केलेला नव्हता. फरहान हक यांनी सांगितले की, जगात अनेक ठिकाणी घडणार्‍या दुर्घटनांमुळे त्यांना त्यांच्या आकडेवारीत बदल करावा लागला आहे. लिबियातील पुरात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत अजूनही बदल होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

Libya flood : लिबियात नेमकं काय झाले?

डॅनियल या अतितीव्र वादळ पूर्व लिबियाच्या किनाऱ्यावर जोरदार धडकले. यामुळे या भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि याचा सर्वात अधिक फटका हा लिबियातील डेरना या शहराला बसला. मुसळधार पावसातील येथील दोन धरणे देखील फुटली. त्यामुळे येथील घरी कोसळली असून लोक वस्त्याही पाण्याबरोबर वाहून गेल्या. १ लाख लोकसंख्येच्या या शहरात या पुराच्या पाण्याने अक्षरश: मृत्यूचे तांडव केले. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

लिबियाला जगभरातून मदत 

पुरानंतर लिबियातील डेरना येथे मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या साह्याने समुद्रात मृतदेहांचा शोध सुरू आहे. डेरनाची सुमारे १,२०,००० लोकसंख्या आहे. पुरामुळे जवळजवळ संपूर्ण शहर वाहून गेले आहे. शहराच्या दक्षिणेला असलेले दोन बंधारे तुटल्याने हा पूर आल्याने लोक वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. लिबियाला मदत करण्यासाठी ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत लागेल असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. त्यासाठी जगभरातील देशांना आवाहन केले आहे. WHO ने पूर्व लिबियामध्ये राहणाऱ्या सुमारे २,५०,००० लोकांना आपत्कालीन मदत पाठवली आहे. यामध्ये अत्यावश्यक औषधे, शस्त्रक्रिया साहित्य आणि मृतदेह झाकणाऱ्या पिशव्या पाठवण्यात आल्या आहेत. रशिया आणि सौदी अरेबियानेही मदत पाठवली आहे. इटलीने तंबू, ब्लँकेट, पाण्याचे पंप मदत पाठवली आहे.

हेही वाचा 

Back to top button